आमच्या आयुष्यावर उदार!


नाशिक - मुंबई महामार्ग आत्ता एकतर्फी रहदारीचा झाल्या पासून त्यावर प्रवासाचे सुख खरे वाढायला हवेत. समोरून वेगाने गाड्या येण्याची भीती नसल्याने आपण वेगाने जाण्याचे मनात खलत नाही. शिवाय भलते सलते traffic jam होऊन प्रवास लांबण्याचा संभाव कमी असतो. तरीही ह्या प्रवासाची विचित्र भीती माझ्या मनात बसली आहे! गेल्या ५ - ६ वेळा अगदी न चुकता प्रवास प्रचंड घाबरण्यात गेला. संपूर्ण महामार्ग आणि घाटात जे पदायात्रिक स्वतःच्या इच्छा पूर्ण ह्वाव्यात किंवा झाल्या म्हणून त्यांचे दर्शन संपूर्ण करण्याकरता जे बेभान होऊन जात असतात, त्यांना बहुतेक हा मार्ग वाहने चालावण्याकर्ता सुद्धा वापरला जाऊ शकतो ह्या वस्तुस्थितीचा विसर पडत असावा! शाळेत भाषेच्या पेपर मधेय आम्हाला "वाक्प्रचार वापरून संपूर्ण ओळ लिहावे" असा एक प्रश्न असे! त्यात "आयुष्यावर उदार" असा जर वाक्प्रचार आला तर, "मुंबई-नाशिक महामार्गावरील पदायात्रिक आमच्या आयुष्यावर उदार होऊन त्यांच्या दर्शना करता जातात" असे म्हणणे आता मात्र चुकीचे ठरणार नाही.

Comments

Popular posts from this blog

The Closet

At the gym...

Lunch time